InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा, अन्यथा ….;’ गडकरींनी दिला पाकला इशारा

- Advertisement -

पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. अन्यथा, भारत आपल्या भूमीतून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखेल, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी पाकिस्तानला दिला. पंजाबमधील एका सभेत बोलताना गडकरी यांनी पाकिस्तानला रोखठोक शब्दांत सुनावले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली पाणीवाटप करार झाला. दोन्ही देशांमधील शांततापूर्ण संबंध हा त्या कराराचा आधार आहे. मात्र, पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत; तर कठोर निर्णय घेण्यास भारताला खूप वेळ लागणार नाही, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.