“ऑक्सिजन किती आहे, हे सांगणं सरकारने बंद करा आणि…;” सुब्रमण्यम स्वामींचा मोदीला घरचा आहेर

दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दररोज शेकडो रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर दुसरीकडे देशात ऑक्सिजनचा तुटवडा नसून, मुबलकप्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा मोदी सरकारकडून वारंवार केला जात आहे. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे दररोज रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनअभावी रुग्णांचे प्राण जात असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातही अशाच घटना सोमवारी घडल्या. या घटनांनंतर भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

स्वामी यांनी ऑक्सिजन टंचाईच्या मुद्द्यावरून एक ट्विट केलं आणि सरकारला संसदेच्या स्थायी समितीने दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली. “देशात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, हे सांगणं सरकारनं बंद करावं. पण, आम्हाला हे सांगावं की, किती जणांना ऑक्सिजन देण्यात आला आणि कोणत्या रुग्णालयांना देण्यात आला? ऑक्टोबर २०२०मध्ये संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समितीने ऑक्सिजन सिलेंडर उत्पादन आणि पुरवठ्याचा तुटवडा असल्याचा इशारा दिला होता. पण, तरीही सरकार त्रस्त झालं नाही,” असं म्हणत स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा