सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका : चंद्रकांत पाटील

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाढीव बदल्यांना दिलेली परवानगी मागे घेऊन कायद्याचे उल्लंघन टाळावे.राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती, तिसऱ्या लाटेचा धोका आणि पुराचे संकट ध्यानात घेऊन सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी एका पत्राद्वारे केले.

गेल्या काही दिवसांत राज्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्याचा धडाका राज्य सरकारनं लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे आवाहन केलं आहे. चंद्रकांतदादा पाटील पत्रात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीची मर्यादा वाढवून 25 टक्के केली आहे. त्यासोबत विशेष कारणास्तव 10 टक्के बदल्यांना परवानगी दिली आहे.

पुढे अशा रितीने एकूण संख्येच्या 35 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास परवानगी दिली गेली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे 2005 साली राज्यात बदलीचा कायदा झाला आणि एकूण संख्येच्या तीस टक्केपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास कायद्याने प्रतिबंध झाला आहे. तथापि, एकूण 35 टक्के बदल्यांना परवानगी दिल्याने कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा