InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘पूरपट्ट्यात घरांना परवानगी देणा-या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार’

- Advertisement -

केवळ सांगली शहरातच नव्हे, तर संपूर्ण देशभरातच पूरनियंत्रण रेषेच्या आत घरे बांधण्यात येत आहेत व त्याला परवानगीही देण्यात येत आहे. पुरासारखी भयंकर परिस्थिती आल्यानंतर ही बाब लक्षात येते. पूर नियंत्रण रेषेत घरांच्या बांधकामांना परवानगी देणे, ही बाब गंभीर असून पूरपट्ट्यात घरांना परवानगी देणा-या अधिकारी व बांधकाम करणा-या बिल्डरांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाजन म्हणाले की, विक्रमी झालेल्या पावसाचा कोणत्याच यंत्रणेला अंदाज आला नाही. तरीही पूरपट्ट्यात झालेले अतिक्रमण व नैसर्गिक नाले सपाट झाल्यानेही पुराची तीव्रता वाढली आहे. ही बाब गंभीर असून पूर नियंत्रण रेषेच्या आत घरे बांधणाऱ्यांचे दुसऱ्या जागी पुनर्वसन करणे व या भागात घरे होणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यायला हवी. महापालिकेच्या आयुक्तांचा बंगला पूरपट्ट्यात येत असेल, तर याचीही चौकशी करण्यात येईल.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.