राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन

रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी १ ते ८ जुलै या कालावधीत १०० टक्के करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी रविवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सर्व नगरपालिकांचे धोरण सुसंगत असावे – पालकमंत्री उदय सामंत

या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५६ आहे. कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर संबंधितांशी चर्चा करुनच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

धक्कादायक : साताऱ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

रत्नागिरी शहरात आणि दापोलीतील २ गावात रुग्णांचा कोणताही इतिहास नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.