संजय राऊतांकडून गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा जोरदार निषेध, म्हणाले…

नाशिक : सध्या नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं आहे. मात्र आता हे साहित्य संमेलन काही वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतंय. दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या घटनेचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध नोंदवला आहे. या संपूर्ण घटनेचा मी निषेध करतो. लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित दैनिकाचे गिरीश कुबेर हे ज्येष्ठ पत्रकार संपादक आहेत. त्यांनी जे काही लिखाण केले किंवा करत आहेत, त्याविषयी मतभेद असू शकतात. मधल्या काळात त्यांच्या पुस्तकावरून वाद झाला होता तो मी ही वाचला. मुळात त्यांनी काय लिहिलंय हे लोकांनी वाचले आहे.
पण न वाचता त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणे आणि ते ही मराठी साहित्य संमेलन सुरू असताना असे कृत्य करणे हे कोणालाही मान्य होणार नाही. त्यांनी जे लिहिले त्यांच्या पुस्तकात याप्रकरणी काही लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत. काहींनी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात कायदेशीर कारवाई होईल. साहित्य संमेलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वांत मोठे व्यासपीठ असते, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; साहित्य संमेलनादरम्यान संभाजी ब्रिगेडचे कृत्य
- मी कधीच शेतकऱ्यांची माफी मागणार नाही : कंगना राणौत
- आदित्य ठाकरेंनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत!
- सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते : फडणवीसांचा टोला
- साहित्य संमेलनाला सावरकरांचे नाव देऊ नये, म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले; फडणवीसांचा गौप्यस्फोट