InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सीईटी प्रवेशातील गोंधळामुळे विद्यार्थी आक्रमक

- Advertisement -

सीईटी सेलच्या पदाधिकऱयांच्या हलगर्जीपणामुळे 3 लाख विद्यार्थ्याची व्यावसायिक अभ्यासक्रमाची नोंदणी रद्द झाली. पालक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गोंधळात गेली आहे असा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेकडून राज्य सरकारवर करण्यात आला आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्य सामायिक परीक्षा संचालकांची भेट घेतली आहे. एमएच-सीईटी च्या पर्सेटाईलच्या नवीन सूत्रांमुळे पीसीएमच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे असा आरोप करत विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ असा इशारा युवासेनेने दिला आहे.

सुविधा केंद्राच्या संख्येत वाढ करावी, ठाणे,कल्याणला सुद्धा सुविधा केंद्र वाढविण्यात यावीत, झेरॉक्स, स्कॅनिंग आणि अपलोडिंग मोफत स्वरूपात सुविधा केंद्रावरच करण्यात यावी, CET सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या खिशातून विद्यार्थ्यांना झेरॉक्स, स्कॅनिंग,अपलोडिंग आणि प्रवास खर्च देण्यात यावा , झालेल्या गोंधळाबद्दल CET सेलच्या पदाधिकाऱ्यांवर चौकशी समिती बसवावी, आदी मागण्या प्रहार विद्यार्थी संघटनेने केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.