InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘गुजरात दंगली’वरील केस स्टडीचा अभ्यास

दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘गुजरात दंगली’वरील केस स्टडीचा आणि एलजीबीटी कम्युनिटीशी संबंधित धड्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर काही शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. तसचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील धड्यालाही काही प्रमाणात कात्री लावण्यात आल्याने त्यालाही विरोध करण्यात आला आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी नव्या अभ्यासक्रमाला स्टँडिंग कमिटीने मंजुरी दिली आहे. यावेळी इंग्रजी आणि इतिहास विभागाच्या काही पेपर्सवर बैठकीत जोरदार चर्चा झाली होती. इंग्लिशच्या पेपरमध्ये गुजरात दंगलीचा केस स्टडी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

तर इतिहासाच्या अभ्यासक्रमातून सुफी संत अमीर खुसरो यांचा धडा वगळण्यात आला आहे. अभ्यासक्रमाच्या या भागांची समीक्षा करण्यात येणार असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच येत्या १५ जुलै रोजी हा नवा अभ्यासक्रम अकॅडमिक कौन्सिलसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply