Subhash Desai | “गद्दारी करून जर कुणी फिरतं असेल तर…” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
मुंबई : शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर करण्यात आलेल्या हल्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्याचा उदय सामंत, आमदार तानाजी सावंत यांनी निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
राज्यात अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, असं सांगतानाच हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर, शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. ही तर कार्यकर्त्यांची उत्सुफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेतून ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit pawar | उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राहणार विरोधी पक्षनेते अजित पवार
- Rohit Pawar : अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? ; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर रोहित पवारांचे सुचक ट्वीट
- Supreme Court Hearing : आज शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार! सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष
- Uday Samant : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करू नये – नीलम गोऱ्हे
- CM Eknath Shinde : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
Comments are closed.