Subhash Desai | ठाकरे गटाला मोठा धक्का; भूषण देसाईंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
Subhash Desai | मुंबई : शिवसेनेमध्ये गेल्या 8 महिन्यांपूर्वी मोठी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तेत असतानाही 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. 40 आमदारांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षाला मोठं भगदाड पडलं.
40 आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर अद्यापही ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का देणारी राजकीय घडामोड घडली आहे.
भूषण देसाईंचा उद्धव ठाकरेंना रामराम
मुंबई येथे पत्रकार परिषद व जाहीर पक्षप्रवेश https://t.co/Ephg2cpHGj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 13, 2023
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे सुपुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे.
Subhash Desai’s son Bhushan Desai joined the Shinde group’s Shivsena
उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्या अनेक नेत्या, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यातच आता सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित बाळासाहेब भवनात पक्षप्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
- Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे
- Ajit Pawar | “40 आमदारांना सांभाळायला निधीची उधळण, म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- अजित पवार
- Ajit Pawar | “जिकडे मुख्यमंत्री तिकडे शंभूराज, बॉडीगार्डसारखी पाठच सोडत नाहीत”; अजित पवारांचा खोचक टोला
- Ashish Shelar | रस्त्यांच्या कामावरुन विधानसभेत आदित्य ठाकरे-आशिष शेलार यांच्यात खडाजंगीa
- Sanjay Raut | “तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका”; ‘त्या’ व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया
Comments are closed.