InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“भाजपचा उमेदवारच नसताना, पवारांचे मत कमळाला कसे गेले ?”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घड्याळासमोरचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत जात असल्याचे मी स्वत: पाहिल्याचे म्हटले होते. यावर आता  भाजप नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपचा उमेदवारच नसताना, पवारांचे मत कमळासा कसे गेले ? असा सवाल देशमुख यांनी केला आहे.

सुभाष देशमुख म्हणाले, “शरद पवार हे गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. त्यांना राजकारणातील सर्व गोष्टी ज्ञात आहेत. आता त्यांना विजय आणि पराभवाची चाहूल लागली असेल. पराभवाला सामोरे जात असल्यामुळे अगोदर सांगायचे मशीन खराब आहे, आता म्हणतात बटण दाबले तर कमळाला मत जाते. खरे म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी मतदान केले, बहुतेक त्या ठिकाणी कमळ हे चिन्ह नव्हते.”

असे असले तरी, शरद पवारांनी ईव्हीएमबाबतचं वक्तव्य हे गुजरात, हैदराबादचा संदर्भ देऊन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.