Subodh Bhave | “नालायक राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम”; सुबोध भावेचा घणाघात

पुणे : पुण्यातील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे करण्यात आली. याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता सुबोध भावे याने उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्याने देशातील शिक्षण व्यवस्था आणि राजकारण्यांवर भाष्य केले.

“आपल्या करियरच्या पलीकडे आपण खरंच देशाचा विचार करतो का? आपल्याला वाटतं कि आपण निवडून दिलेले नालायक राजकारणी देशाची काळजी घेतील. पण ते काय करतायेत हे आपल्या समोरच आहेत. आपण लायकी नसणाऱ्यांच्या हाती देश उभारणीचे काम दिले आहे. या संस्थेची सुरुवातच राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे जर देशात राष्ट्रीय शिक्षणच मिळणार नसेल तर देशाचा विचा करणारी पिढी तयार होतच नसेल तर मग काय फायदा या शिक्षणाचा?, त्या काळी इंग्रजांनी त्यांच्यासाठी नोकर तयार करण्यासाठी भारतात शिक्षण व्यवस्था सुरु केली. मात्र तीच व्यवस्था अजूनही आहे. आपण अजूनही फक्त नोकरच तयार करतोय”, अशी सणसणीत टीका सुबोध भावेने केली.

येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्या पिढीला देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. म्हणूनच “मुंबई आणि महाराष्ट्रातून काही लोक (गुजराती आणि राजस्थानी) निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, अशी वक्तव्ये राजकारणी मंडळी करतायेत, अशी टीका सुबोध भावे याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं नाव न घेता केली आहे.

राज्यपालांनी मागितली माफी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. राज्यपाल माफीनाम्यात म्हणाले, “माझ्याकडून चूक झाली. समाजातील काही घटकांच्या योगदानाची चर्चा करताना चूक झाली. देशाच्या विकासात प्रत्येकाचे योगदान आहे. गेल्या तीन वर्षात मला महाराष्ट्रात खूप मान मिळाला आहे.” दोन दिवसांपूर्वी राज्यपाल म्हणाले होते की मुंबई ही राजस्थानी आणि गुजरातींमुळे आर्थिक राजधानी बनली आहे. त्यांनी मुंबई सोडली तर पैसेही उरणार नाहीत. मग महाराष्ट्रात काय उरणार?

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.