Subodh Bhave | “लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”; सुबोध भावे याची टीका

पुणे : अभिनेता सुबोध भावे हा त्याने केलेल्या राजकीय विधानामुळे चर्चेत आला आहे. अनेक कलाकार हे हे त्यांची राजकीय मतं मांडत नाहीत. ते नेहमीच ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र सुबोधने त्याची मतं स्पष्टपणे मांडल्याने त्याच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले जात आहे. सुबोधने काल एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली. कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर त्याने भाष्य केले.

“आपण लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”, अशा आक्रमक शब्दात त्याने यावेळी टीका केली. सुबोध म्हणाल कि, “या राजकारण्यांच्या हातात देश दिल्याने काही होणार नाही. सध्या राजकारणी काय करतायेत हे आपण पाहतोच आहोत. त्या काळी इंग्रजांनी त्यांच्यासाठी नोकर तयार करण्यासाठी भारतात शिक्षण व्यवस्था सुरु केली. मात्र तीच व्यवस्था अजूनही आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्या पिढीला देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. म्हणूनच “मुंबई आणि महाराष्ट्रातून काही लोक (गुजराती आणि राजस्थानी) निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, अशी वक्तव्ये राजकारणी मंडळी करतायेत, असं सुबोध भावे म्हणाला.

तसेच सध्या आपल्या देशात चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी विदेशात जाण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळेच अजाणिवेतून आपण नालायक राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचे काम दिले आहे, असे मतं व्यक्त करत सुबोधने नाव न घेता राजकारणी मंडळींवर टीका केली. पुण्यातील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे करण्यात आली. याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुबोध भावेने उपस्थिती लावली होती.

दरम्यान सध्या सुबोध भावे याचा नवीन मुलाखतपार कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु झाला आहे. ज्याचे नाव बस बाई बस असे आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विविध किस्से सांगत हा कार्यक्रम रंजक बनवला. त्यामुळेच या कार्यक्रमाला रसिकांची पसंती मिळत आहे.

राज्यपालांनी मागितली माफी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. राज्यपाल माफीनाम्यात म्हणाले, “माझ्याकडून चूक झाली. समाजातील काही घटकांच्या योगदानाची चर्चा करताना चूक झाली. देशाच्या विकासात प्रत्येकाचे योगदान आहे. गेल्या तीन वर्षात मला महाराष्ट्रात खूप मान मिळाला आहे.” दोन दिवसांपूर्वी राज्यपाल म्हणाले होते की मुंबई ही राजस्थानी आणि गुजरातींमुळे आर्थिक राजधानी बनली आहे. त्यांनी मुंबई सोडली तर पैसेही उरणार नाहीत. मग महाराष्ट्रात काय उरणार?

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.