InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राहुल गांधींविरोधातील वक्तव्य सुब्रमण्यम स्वामींना पडले महागात

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणे भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्वामी यांच्याविरोधात राजस्थानात २० याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेनंतर यूथ काँग्रेसकडून विविध पोलीस स्टेशनमध्ये ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राहुल गांधी हे अंमलीपदार्थाचे सेवन करतात असे वादग्रस्त विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वामी यांच्याविरोधात कलम ५०४, कलम ५०५ आणि कलम ५११ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी या वक्तव्याप्रकरणी जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply