Sudha Murti | श्रेया घोषाल संग ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर थिरकल्या सुधा मूर्ती, पाहा व्हिडिओ

Sudha Murti | बेंगलोर: प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या अर्धांगिनी सुधा मूर्ती (Sudha Murti) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या सुधा मूर्ती त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. सुधा मूर्ती या व्हिडिओमध्ये गाणं गात नाचताना दिसल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये सुद्धा मूर्ती यांना गाणं गायचा आणि डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी श्रेया घोषाल सोबत ‘बरसो रे मेघा’ या गाण्यावर नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बेंगलोर येथील इन्फोसिसच्या एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती श्रेयासह काही लोकांच्या उपस्थितीत गाणं गाताना आणि डान्स करताना दिसल्या.

श्रेया सुश या नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेया घोषाल आणि सुधा मूर्ती ‘गुरु’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बेंगलोरमध्ये इन्फोसिस कंपनीला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये गायिका श्रेया घोषालसह लेखिका सुधा मूर्ती यांनी गाणे गाऊन नृत्य केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी कार्यक्रमाचे पुरेपूर आनंद घेतल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.