Sudhanshu Trivedi | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सुधांशु त्रिवेदींचं स्पष्टीकरण; म्हणाले,

Sudhanshu Trivedi | नवी दिल्ली : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती”, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.

हे वाद ताजे असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. या विधानानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एका कार्यक्रमात विधान केलं. त्रिवेदींच्या विरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

ते म्हणाले, “जो शब्द बोलला नाही त्यावरून तुम्ही वाद निर्माण करत आहात. मी विचारू इच्छितो की लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत? औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली. यामुळे मी म्हणतोय की राजकारणात महत्त्व या गोष्टीला आहे की कोण बोलतय.”

पुढे ते म्हणाले, “राजकारणात एक गोष्ट आणखी असते, काय बोललं त्यापेक्षा महत्त्वाचं असतं कोण बोलत आहेत. मी केवळ एवढचं नम्रपणे सांगू इच्छितो की, हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाचे सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबाबत, जर कोणी विचार केला की माझ्या मनात किंचतही अवमान असू शकतो, तर मला असं वाटतं एकतर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार केला पाहिजे, स्वत:च्या दृष्टिकोनावर विचार केला पाहिजे.”

याशिवाय “जो प्रश्न विचारतोय त्यालाही महत्त्व असते. कोण विचारत आहे, ते विचारताय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का?”, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. पुढे ते म्हणतात छत्रपती शिवजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ रोजी शपथ घेतली होती की हिंदवी साम्राज्य बनवेन. हे(टीका करणारे) हिंदू साम्राज्य या शब्दाला मानतात का? नाही मानत. त्यानंतर त्यांचे साम्राज्य बनले त्यांचं नाव होतं हिंदूपतपातशाही, यालाही ते मानत नाहीत.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.