Sudhir Mungantiwar | “…तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू”, सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार
Sudhir Mungantiwar | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप (BJP) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका करत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यावरुन फडणवीस यांचा जुना व्हिडीओ प्ले केला. तसेच त्यांना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा, या शब्दात जोरदार टीका केली होती.
याला प्रत्युत्तर देत, जुने ऑडिओ ऐकून जर जनाची नाही आणि मनाची लाज ठेवायची असेल, तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू आणि सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी, असा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यादरम्यान, तुम्हीच जाऊन बांधावर जाऊन सांगितलं होतं, पन्नास हजारांची मदत देऊ, कुठे गेली ती मदत. तुम्ही सांगितलं होतं, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधी संबंध ठेवणार नाही, तुमचाच व्हिडिओ आहे, मग कोणी जनाची नाही तर मनाची ठेवावी. छगन भुजबळ बद्दल तुम्ही काय म्हणायचे, तुम्ही श्री राम आणि श्रीकृष्णाला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले, जनता निवडणुकीत लाज काढतेच, तर वाट पाहू जनता कोणाची लाज काढते, असा घणाघात मिनगंटीवार यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे खूप गंभीरतेने बघू नये. शिवसेनेतील नेत्यांना ते गटारातील किडे म्हणतात. मात्र, ते आधी शिवसेनेचे होते ना, शिवसेना काही गटार आहे का, अब्दुल सत्तारांना तुम्हीच प्रवेश दिला होता, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “ज्योतिषाला विचारून काय उपयोग? तुमचे भविष्य…”, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- Sushma Andhare | “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू…”, सुषमा अंधारे संतापल्या
- Eknath Shinde | “फ्रिजच काय कंटेनरमधले खोके…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- Sambhajiraje Bhosale | “…तर उठाव होणारच”, संभाजीराजे भोसले कडाडले
- Sanjay Raut | संजय राऊत यांचं संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांना आवाहन, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.