Sudhir Mungantiwar | शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे; सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

Sudhir Mungantiwar | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येणार होती. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) चार दिवस आधी मागे फिरले, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणावरून  सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

The alliance between BJP and NCP was almost done – Sudhir Mungantiwar

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “शरद पवार यांनी आम्हाला धोका दिला यामध्ये तथ्य आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती जवळपास झाली होती. त्याचबरोबर पालकमंत्री आणि जिल्हे वाटप सुद्धा पवार साहेबांकडून करण्यात आलं होतं. मात्र, ऐन वेळेवर ते मागे फिरले.”

पुढे बोलताना ते (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.”

“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आम्ही एकत्र लढलो आहोत. पक्षानं मन मोठं करून त्यांना जागा दिल्या होत्या. आमच्या पक्षातून आम्ही त्यांना एक उमेदवारही दिला होता. मात्र, त्यांनी आमच्यासोबत बेईमानी केली”, असही ते (Sudhir Mungantiwar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PSRqE3