Sudhir Mungantiwar | शिवसेनेचे 40 आमदार फुटतात, ठाकरेंचा काहीतरी दोष असेल ना? – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | मुंबई : राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. तर मोदींवरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी विरोधी पक्षाच्या भेटू गाठी वाढल्या आहेत. तर काल (24 मे) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र झाले तरी मोदींचा पराभव करणं अशक्य असल्याचं म्हटल. त्यावरून राजकीय वर्तुळात टीका-टिपण्णीला सुरुवात झाली आहे. तर ठाजरे गटाकडून देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर देण्यात आलं. त्यानंतर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Sudhir Mungantiwar Targeted On Uddhav Thackeray

सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जे आज उद्धव ठाकरे बोलता ते त्यांनी गेल्या अडीच वर्षात का बोललं नाही. मुख्यमंत्री असताना राज्याची काय अवस्था केली आहे. शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन त्याच्याशी खोटं बोलणं, राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट करून ठेवण अशी काम त्यांनी केली आहेत. तसचं उद्धव ठाकरे म्हणतात ना आता की आम्ही 25 वर्ष भाजपबरोबर सडलो त्यांनी आता भाजपासोबत युती केली. मग मला विचारायचं आहे जर शिवसेनेचे ४० आमदार बंड करून बाहेर पडतात, फुटतात तर उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यामध्ये तुमचा काहीतरी दोष असेल ना?” असा प्रश्न देखील सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंना विचारला.

उद्धव ठाकरेंना स्वतःचे 40 आमदार टिकवता आले नाही – सुधीर मुनगंटीवार

दरम्यान, ज्यांना स्वतःचे आमदार टिकवता येत नाहीत, जनतेचा विश्वास टिकवता येत नाही, त्यांनी राजकारणात राहून काय करायचंय? तुमचा काहीच यामध्ये दोष नाही का? तो दोष तुमच्या स्वभावाचा आहे. तुम्ही ज्या प्रकारे लोकांशी वागता त्या वृत्तीचा दोष आहे. अशा शब्दांत मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. तसचं त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) देखील टोला लगावत म्हटलं की, आम्ही म्हनतं नाही बाळासाहेबांबद्दल तुम्ही फडणवीसांकडून शिका परंतु, बाळासाहेबांकडून तर शिका. असा टोला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊतांना ( Sanjay Raut) लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ODkw9C

You might also like

Comments are closed.