Sudhir Mungantiwar | “सत्ता गेल्यामुळे ठाकरेंची चिडचिड”; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

“सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे, ती शब्दांच्या माध्यमातून ते चिडचिड व्यक्त करत आहे. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचे एकही भाषण नाही, ज्यामध्ये त्यांनी राज्यातल्या जनतेसाठी त्यांच्या काळात घेतलेला एखादा निर्णय सांगितला असेल. कोरोनाच्या धास्तीमुळे मंदिरं बंद ठेवली, पण मद्यालये सुरु केली. मुंबईत दोन दिवसांचे अधिवेशन व्हायचे, पण नागपूरचे अधिवेशन घेतले नाही. धान देण्यात भ्रष्टाचार होतो, असे सांगत शेतकऱ्यांना बोनस दिला नाही. अशा एक ना अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास देण्याचे काम झाले”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर केली आहे.

“देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे टोमणे बॉम्ब आहे. टोमणे मारणे हाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराक्रम आहे. ठाकरेंची भाषा त्यानांच लखलाभ असो”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

“सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंची चिडचिड होत आहे” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “भाजपसाठी मतदारांनी अनुकूल व्हावे, यासाठी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नवनवीन उपक्रम राबवत असतात”, असा उपरोधिक टोला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :