Sudhir Mungantiwar | 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. शिंदे सरकारची वैधता, शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांची निवड या सर्व प्रकरणांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे म्हटले जात असताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवी तारीख दिली आहे.

मंत्र्यांचा शपथविधी नेमका कधी होणार याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र साधारणत: १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे हे झेंडावंदन आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होईल, याबाबत मनात शंका नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.