InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याची गोड बातमी मुनगंटीवारच देतील – संजय राऊत

युतीतली कोंडी काही सुटायचं नाव घेत नाही आहे. त्याचंपार्श्वभूमीवर भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपने भूमिका स्पष्ट करुन तासही लोटत नाही तोच शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

145 चं संख्याबळ असेल तर भाजपने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करावा असं राऊत यांनी भाजपला चिमटा काढली आहे. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याची गोड बातमी मुनगंटीवारच देतील अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवारांना टोला हाणला आहे. तसेच भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले.

Loading...

राज्यपालांना आम्हीही भेटलो, विनोद तावडे भेटले, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस भेटले त्यांना कोणीही भेटू शकतो. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि चांगलं सरकार द्यावं असेही राऊत म्हणाले. तर भाजपचे सरकार येता कामा नये हे काँग्रेसचं मत असून त्यांच्या प्रमुख आमदारांनी याबद्दलच्या भावना कळावल्या आहेत. पण मी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असेही राऊत म्हणाले. काँग्रेस आमदारांच्या मागण्यांचं कौतुक करतो, स्वागत करतो. त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचं सरकार यावं. मला खात्री आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत राहणार नाही

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.