InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

परळी तालुक्‍यात उसाचे क्षेत्र यंदा वाढणार

तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी ऊसलागवडीस सुरवात केली असून, यंदा उसाचे क्षेत्र वाढणार आहे. दोन वर्षांपासून तालुक्‍यात पावसाने ओढ दिल्याने लहानमोठे तलाव कोरडेठाक पडले होते. सिंचनासाठी पाणी नसल्याने ऊसलागवडीचे क्षेत्र कमी झाले होते. मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी कमी पाण्यावरील इतर पिके घेतली होती. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण फिरावे लागत होते. यंदाही पावसाळ्यात पाऊस पडला नाही. ऑक्‍टोबर महिन्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसला. त्यामुळे तालुक्‍यातील तलावात पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांनी ऊसलागवडीस सुरवात केली आहे.

विशेषतः माजलगाव धरणातून निघालेल्या व तालुक्‍यातून जाणाऱ्या उजव्या कालव्याच्या सिंचनाखाली येणाऱ्या शेतशिवारांत म्हणजे डिग्रस, पौळ पिंपरी, पिंपरी, गोवर्धन हिवरा, सिरसाळा, कानडी, गाढेपिंपळगाव, नाथरा, इंजेगाव आदी ठिकाणी ऊसलागवडीस वेग आला आहे. यामुळे कापूस वेचणीबरोबरच ऊसलागवड जोरात सुरू आहे. दरम्यान, ऊसलागवड व कापूस वेचणीसाठी सध्या ग्रामीण भागात मजुरांची वानवा जाणवत आहे.

Loading...

दरम्यान, गाढेपिंपळगाव येथील युवा शेतकरी अमर आरसुळे यांनी ट्रॅक्‍टरवरील नांगराला एक सहा इंच प्लास्टिक पाइपचा सहा फुटांचा तुकडा दोन्ही बाजूंना लावला. यातून कापलेले उसाचे बेणे ट्रॅक्‍टरवर बसून ज्या पद्धतीने पेरणी करतो तसे त्यात सोडले. ट्रॅक्‍टरवर एक कापलेली पाण्याची टाकी ठेवून त्यात बेणे साठवले. हे बेणे पाइपमध्ये सोडले. यामुळे ऊसलागवडीसाठी कमी मजूर व कमी वेळेत जास्त ऊसलागवड करणे शक्‍य झाले. सध्या एका एकरला ऊसलागवडीसाठी चार हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे, तर ट्रॅक्‍टरला तीन ते चार एकरसाठी चार हजार रुपये खर्च येत आहे. यामुळे कमी वेळेत, कमी खर्चात जास्त ऊसलागवड होत आहे.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.