Suhana Khan | किंग खानची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट?

Suhana Khan | मुंबई: बॉलीवूड किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या चर्चेचे कारण बनला आहे. बॉलीवूडमध्ये एकीकडे किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे वादविवाद निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे किंग खानचा मुलागा आणि नेरा फतेही डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात  शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अगस्त्य आणि सुहाना यांचे नातं मैत्रीच्या पलीकडे आहे. हे दोघे ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा कपूर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत पोहोचला होता. या पार्टीमध्ये अगस्त्याने सुहानाची ओळख जोडीदार म्हणून करून दिली आहे. त्यामुळे अगस्त्य आणि सुहाना यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांच्या नात्याची सुरुवात ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यान दोघेजण एकमेकांसोबत बराच वेळ घालवत होते. त्यांना त्यांचं नातं जाहीर करायचं नाही, असं देखील एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी यांच्या अफेअरबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

एकीकडे सुहाना खानच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलेलं असताना, दुसरीकडे आर्यन खान आणि नोरा फतेही यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान आणि नोरा फतेही एकमेकांना डेट करत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या पार्टीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांचे फोटो बघून त्यांच्या अफेरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. कारण आर्यन आणि नोराच्या कॉमन मित्राद्वारे त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहे. त्याच्या या फोटोमध्ये दोघेही स्पॉट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.