Sujay Vikhe Patil | “थोरात महिनाभर टीव्हीसमोर का आले नाहीत? याचा अर्थ जेकाही झालं…”- सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर त्यांचे मामा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ऑपरेशन झाले. ते विश्रांती करत होते. त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष कोणताही सहभाग घेतला नाही. ते महिनाभार काहीच का बोलले नाही, यावरून आता विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

“थोरात महिनाभर टीव्हीसमोर का आले नाहीत?”(Sujay Vikhe Patil)

“एक महिना बाळासाहेब थोरात राजकारणावर काहीच भाष्य करत नाहीत. याचा अर्थ जेकाही झालं ते थोरात यांच्या संमतीनं झालं. सुजय विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात हे एक महिना टीव्हीसमोर येऊ शकले नाही. याचा खुलासा त्यांनी करायला हवा”, असे सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

सुजय विखे पाटलांचा टोला

“एखादा व्यक्ती आजारी असताना बोलूच शकत नाही, असं नाही. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असेल तर तो सर्वांसाठी असावा. एक महिना राजकारणावर काहीचं भाष्य करत नाही. याचा अर्थ सत्यजीत तांबे यांच्याबाबत जी काही प्रक्रिया घडली आहे ती त्यांच्या संमतीनं घडली आहे. हे कुठही नाकारून चालणार नाही”, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.