Sujay Vikhe Patil | महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या प्रकल्पावर सुजय विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : नागपूरमध्ये (Nagpur) होणारा  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’(Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यामुळे  आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना अधाण आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

काय म्हणाले सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)

संबंधित कंपन्यांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातच घेतला असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.  सुजय विखे पाटील म्हणाले, संबंधित कंपन्या आपला प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारशी संपर्क साधत होत्या. प्रकल्पासाठी जमीन आणि काही अटी शिथिल करण्याची मागणी कंपन्यांकडून केली जात होती. मात्र महाविकास आघाडीने संबंधित कंपन्यांकडे टक्केवारी मागितली, त्यामुळे या कंपन्यांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

टाटा एअरबस प्रकल्पावर बोलताना विखे पाटील म्हणाले, मागच्या अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेचा उद्योगमंत्री होता. त्यांचा उद्योगमंत्री असताना त्यांनी काय काय उद्योग केले? याचा त्यांनी खुलासा करावा. कुठलाही प्रकल्प एका महिन्यात पळून जात नाही, संबंधित कंपनीने महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात घेतला आहे.

तसेच, एखाद्या छोट्या शेतकऱ्याला घराचं स्थलांतर करायचं असेल तर सहा महिने लागतात. पण महाविकास आघाडीचं म्हणणं आहे, की या सगळ्या मोठ्या कंपन्यांनी एकाच वेळी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडणं, ही महाविकास आघाडीची फार जुनी पद्धत आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळूनच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या, असा आरोप सुजय विखे पाटलांनी महविकास आघाडीवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.