Sun Tanning | चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Sun Tanning | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये टॅनिंग ही समस्या खूप सामान्य आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला या समस्याला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकत नाही. त्यामुळे टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. दह्याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, काळेपणा इत्यादी समस्या सहज दूर केल्या जाऊ शकतात. चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही दह्याचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

दही क्लिंजर (Yogurt Cleanser-For Sun Tanning)

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही दह्याचा क्लिनर म्हणून वापर करू शकतात. दह्याचा क्लिंजर म्हणून वापर केल्याने त्वचेवरील ताजेपणा कायम राहतो. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये दोन चमचे घट्ट दही घ्यावे लागेल. या दह्याच्या मदतीने तुम्हाला चेहरा स्वच्छ करावा लागेल. हे दही तुम्हाला साधारण दहा मिनिटात चेहऱ्यावर राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल.

दही स्क्रब (Yogurt scrub-For Sun Tanning)

उन्हाळ्यामध्ये होणारी टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचे स्क्रब उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा दह्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करावे लागेल. कॉफी आणि दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म चेहरा खोलवर साफ करण्यास मदत करतात आणि चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

दह्याने मसाज करा (Massage with Yogurt -For Sun Tanning)

दह्याने मसाज केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग सहज दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा दह्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म आणि मधामध्ये आढळणारे कारण अँटीबॅक्टरियल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला संसर्गापासून मुक्त करण्यास मदत करतात. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होऊ शकते.

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने दह्याचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खसखसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पोट थंड राहते (Stomach remains cold-Poppy Seeds Benefits)

उन्हाळ्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये पोट दुखी, पोटात जळजळ होणे इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही खसखसचे सेवन करू शकतात. दररोज खसखस खाल्ल्याने पोट थंड राहते.

तणाव कमी होतो (Reduces stress-Poppy Seeds Benefits)

खसखसमध्ये अँटीडिप्रेसेंट गुणधर्म आढळून येतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तणाव किंवा चिंतेमध्ये असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात खसखस समावेश केला पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी खसखस खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी खसखसचे सेवन केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.