Sunil Kedar | मविआच्या बैठकीत संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा होईल- सुनिल केदार

Sunil Kedar | मुंबई : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरु आहे. यादरम्यान, त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर घणाघात केला आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी मध्ये देखील या कारणामुळे फुट पडण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांनी वक्तव्य केलं आहे.

याबाबत बोलताना संजय राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात मविआच्या बैठकीत चर्चा होईल, पक्षनेतृत्वासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सुनील केदार यांनी दिलीये.

भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपूर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं देखील राऊत म्हणाले.

दरम्यान, सावरकर इंग्रजांचे गुलाम होतो असं म्हणताना त्यांनी सेवक शब्दाचा वापर केला असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विषय असा आहे की आजच्या जमान्यामध्ये तुम्ही एक दिवस तुरुंगात राहून दाखवा. मी १० दिवस तुरुंगात राहून आलोय मला तिथे काय असतं हे ठाऊक आहे, असा भाव देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सावरकर तर आंदमानमधील तुरुंगात १० वर्षांहून अधिक काळ राहिले. आज तर लोक दबावामुळे आणि तुरुंगात जाण्याच्या भितीने लोक पक्ष सोडतात, पक्ष विसर्जित करतात, देश सोडून पळून जातात, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.