Sunil Raut | न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर सुनिल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sunil Raut | मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ईडी मधील मुक्काम संपला असून काही दिवसांपुर्वीच ते न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. त्यांच्या जामीनसाठी त्यांनी अर्ज देखील आहे. मात्र, त्यांच्या सुनावणीची तारीख वारंवार पुढे ढकली जात आहे. काल (शुक्रवार 21 ऑक्टोंबर) संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यामध्ये राऊत यांच्या जामीन अर्जावर आता 2 नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेनेचे नेते सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सुनिल राऊत (Sunil Raut)

पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी असून, तेव्हा त्यांना (संजय राऊत) जामीन मिळेल अशी आशा सुनिल राऊत यांनी व्यक्त केली आहे. आगामी 2 तारखेला संजय राऊत यांना जामीन मिळेल, असे मला वाटते. ईडीच्या वकिलांनी त्यांचे लेखी मत न्यायालयासमोर सादर केल्यानंतर राऊतांना जामीन मिळू शकतो. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. आगामी 2 तारखेला ईडीदेखील आपले म्हणणे मांडेल, अशी अपेक्षा आहे. संजय राऊत लवकरात लवकर बाहेर यावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असल्याचंही सुनिल राऊत यांनी सांगितलं.

त्याचबरोबर मागील वेळी संजय राऊत यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र माध्यमांनी राऊत यांच्या तोंडी काही शब्द घातले. दुसरीकडे न्यायालयाने हा राजकीय खटला नसून राऊत यांनी प्रतिक्रिया दिली तर त्यात काही गैर नाही, असे न्यायालयाने सांगितलेले आहे. ईडीला याबाबतीत काही आक्षेप आहे का? असे न्यायालयाने विचारले होते. जोपर्यंत मी जामिनावर बाहेर येणार नाही, तोपर्यंत मी मीडियाशी चर्चा करणार नाही, असे संजय राऊत यांनी ठरवले असल्याचंसुनिल राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत हे महाराष्ट्राचे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. राऊत यांना का अटक केली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. याच कारणामुळे त्यांच्याप्रती महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात सहानुभूती आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक राऊत यांना भेटण्याासाठी उत्सुक आहे. जेव्हा तारीख असते तेव्हा न्यायालय परिसरात गर्दी जमते. ते स्वाभाविकही आहे. गर्दी होत असेल तर ती आटोक्यात आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे न्यायालयाने सांगितलेले आहे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.