Sunil Raut | संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपासून तोडण्याचा प्रयत्न सुरु – सुनील राऊत

मुंबई : अलिबागची जमीन ईडीच्या ताब्यात आहे. तेच प्रकरण ईडीने आज सादर केले. अलिबागची जमीन आम्ही घेतली त्यावेळी त्याचा रेडीरेकनरचा दर 50 लाख होता. तर दहा वर्षानंतर त्या जागेचा रेडीरेकनरचा दर हा 1 कोटी सहा लाख रुपये आहे. यामध्ये कोणताही कॅशचा व्यवहार झालेला नाही. मग यात भ्रष्टाचार कसा आला, असा सवाल संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केला आहे. मागील दोन दिवसांपासून ईडीने जी कागदपत्रे आम्ही इन्कम टॅक्सला दाखवले होते, अशी सर्व कागदपत्रे सादर करून प्रवीण राऊत यांच्याशी संबंध जोडण्याचा चुकीचा आणि खोटा प्रयत्न ते करत आहेत. मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून चौकशीला पूर्ण सहकार्य करू. सोमवारी आम्हाला नक्की न्याय मिळेल, असेही सुनील राऊत म्हणाले.

स्वप्ना पाटकरवर आरोप करताना ते म्हणाले, की कोण स्वप्ना पाटकर? हीच स्वप्ना पाटकर खोट्या कागदपत्रांच्या आरोपाखाली अडीच-तीन महिने अटकेत होती. अशा अटकेत राहिलेल्या व्यक्तीच्या आरोपांवर किती विश्वास ठेवायचा, हे सरकारने आणि ईडीने ठरवावे, असे सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत हे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांना शिवसेनेपासून आणि उद्धव ठाकरेंपासून तोडायचे प्रयत्न चालू आहे. राऊतांना भाजप घाबरते. म्हणूनच अशा राजकीय आकसापोटी आणि सुडाच्या भावनेतून ही कारवाई सुरू असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. मात्र आम्ही हार मानणार नाही. सोमवारी आम्हाला जामीन नक्की मिळेल, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.