InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘हे खपवून घेतलं जाणार नाही’; सुनील तटकरे यांची फडणवीसांवर टीका

- Advertisement -

केंद्राने राज्याला दिलेल्या ४० हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. मात्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. असं असलं तरी या दाव्यावरुन सत्ताधाऱ्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले आहे.

“खरच फडणवीस यांनी केंद्राकडे निधी परत केला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ही खेदजनक बाब आहे. राजकारण जिथे करायचंय तिथे नक्की करावं. पण महाराष्ट्रातील शेतकरी सर्वसामान्य मजूर गरीब असून त्याला मदत मिळण्याच्या बाबातीत कोणी राजकारण करत असेल तर त्याचा निषेधच करायला हवा,” असं मत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.

Loading...

“महाराष्ट्राच्या हिताची जपवणूक करण्यासाठी आज सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना भेटणार असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेते फडणवीस आणि मोदींचे जवळचे संबंध आहेत. सर्व पक्षीय शिष्ठमंडळामध्ये आम्ही देवेंद्रजींनाही घेऊन जाऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे,” असंही तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.