InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

असं घेतलं सनी लिओनीने निशाला दत्तक पहा Exclusive फोटो

सनीने महाराष्ट्रातील उदगीर येथील मुलीला घेतले दत्तक

उदगीर : सुप्रसिद्ध बॉलिवूडस्टार सनी लिओनी ( करणजीत कौर )  व तिचा पती डॅनिअल एच. वेबर यांनी 15 जुलै रोजी उदगिरातील शिशुगृहातील दोन वर्षाच्या निशा या बालिकेला दत्तक घेतले आहे.
sunny leone adopt childसनी लिओनी आणि तिचा पती उदगीरात गुपचूप येऊन ‘ निशा ‘ नावाच्या बालिकेला शिशुगृहातून कसलाही गाजावाजा न करता घेऊन गेले उदगीर येथे संधी निकेतन शिक्षण संस्था संचलित एस. टी. कॉलनी येथे शिशुगृह असून. या शिशुगृहात १४ ऑक्टोबर २०१५ रोजी बालकल्याण समिती लातूर मार्फत एक अवघ्या दोन दिवसाची जन्मलेली  बालिका दाखल झाली होती.
sunny leone adopt childया शिशुगृहाने या बालिकेचे नाव ‘ निशा ‘ असे ठेवून तिचे संगोपन केले. त्यानंतर दि. १७ मार्च २०१६ रोजी बाल कल्याण समिती लातूर यांनी सदरची बालिका निशा हिला दत्तकमुक्त करण्याची घोषणा केली (घोषित केले ) दत्तक देण्यासाठी या निशाला केंद्रीय दत्तक संसाधन एजन्सी महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली.
sunny leone adopt child
या वेबसाईटवर असलेली माहिती पाहून सनी लिओनी उर्फ करणजीत कौर व तिचा पती डॅनिअल एच वेबर यांनी ३० जानेवारी  २०१६ रोजी या निशाला दत्तक घेण्यासाठी आनलाईन नोंदणी करुन दत्तक देण्याची मागणी केली. यांच्या मागणीनुसार केंद्रीय दत्तक संसाधन एजन्सीने १३ जुलै २०१७ रोजी सनी लिओनी व डॅनिअल एच. वेबर यांना दत्तक घेण्यासाठी नाहरकरत प्रमाणपत्र दिले.
sunny leone adopt child केंद्रीय दत्तक संसाधन एजन्सीची परवानगी  घेऊन सनी लिओनी व डॅनिअल एच. वेबर  हे १५ जुलै २०१७ रोजी उदगीरात आले. शहरातील एस. टी. कॉलनी भागात असलेल्या या शिशुगृहात येऊन निशा नावाच्या या पावणे दोन वर्षाच्या या बालिकेला  फास्टर केअर ( तात्पुरत्या संगोपनासाठी ) ताब्यात घेतले. तर कायम स्वरुपी दत्तक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात दत्तक प्रक्रिया सुरु असल्याचे या शिशुगृहाचे दत्तक सल्लागार शिवाजी जाधव यांनी सांगितले.
sunny leone adopt childतर मागच्या २५ वर्षापासून संधी निकेतन शिक्षण संस्थेकडून अशा बालकांचे संगोपन करण्यात येऊन दत्तक देण्याचे कार्य करते . तर शुक्रवार (२१ जुलै ) रोजी  ‘ निशा ‘ या बालिकेला  सनी लिओनी व डॅनिअल एच.वेबर यांनी दत्तक घेतलेल्या प्रक्रियेची जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धर्मानंद कांबळे यांनी तपासणी केली आहे.
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.