सनी लिओन आणि इम्रान हाश्मी यांना आहे २० वर्षाचा मुलगा

झफ्फरपूर : बॉलिबूड अभिनेत्री सनी लिओन आणि अभिनेता इम्रान हाश्मी यांना एक २० वर्षाचा मुलगा आहे. हे एकूण तुम्ही चकित व्हाल. बिहारमधील मुजफ्फरपूर शहरात राहणाऱ्या कुंदन कुमार याने हा दावा केला आहे.

कुंदन कुमार हा मीनापूर येथील धनराज महतो महाविद्यालय शिकतो. हा धक्कादायक खुलासा त्याने विद्यापीठाचा फॉर्म भरताना केला आहे. त्यामुळे सद्या महाविद्यालयासह विद्यापिठात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विद्यापीठाचे कुलसचिव राम कृष्ण ठाकूर यांनी सांगितले आहे की, कुंदन कुमार याने आई-बाप म्हणून इम्रान हाश्मी आणि सनी लिओन यांचे नाव लावल्याचे कळाले आहे. तसेच त्याचा भरलेला फॉर्म ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही माहिती मिळाली आहे. याप्रकारवरून त्याने फसवणूक केल्याचेच दिसत आहे. त्यामुळे याबाबत संबंधित महाविद्यालयातून माहिती घेतली जात असून त्याचा योग्य प्रकारे तपास केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.