InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला तब्बल 4 कोटींची ऑफर

मुंबई : बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून सनी लियोनीची चर्चा आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील लैला गाण्यावर लाईव्ह परफार्मन्स करण्यासाठी सनीला तब्बल चार कोटींची मोठी ऑफर देण्यात आली आहे.ख्रिसमर आणि न्यू ईयर सेलिब्रेशन लक्षात घेऊन एका हॉटेलने सनी लियोनीला लैला गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची ऑफर दिली आहे. लाईव्ह परफॉर्मन्स हा नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमधला महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे सनी लियोनीने या गाण्यानवर लाईव्ह परफॉर्मन्स करावा, अशी हॉटेल आयोजकांची इच्छा आहे.7 डिसेंबर रोजी ‘रईस’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. प्रेक्षकांनाही ट्रेलरला पसंती दिली होती. या सिनेमात सनी लैला मैं लैला या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply