आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा- अरुण कुमार

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात मांडलेल्या मताचा विपर्यास केला जात असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे, असे संघाने सोमवारी स्पष्ट केले. यासंदर्भात रा. स्व. संघाचे प्रचारप्रमुख अरुण कुमार यांनी ट्विट केले आहे .

‘दलित, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्या आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे संघाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात परस्पर सौहार्दपूर्ण चर्चा व्हावी, असे मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले होते.

मोहन भागवतांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावर निष्कारण वाद निर्माण केला गेला आहे. त्यांनी समाजातील प्रश्न सोडवताना परस्पर सौहार्दपूर्ण चर्चांवर भर दिला.या प्रकारे आरक्षणासारखा प्रश्नही सोडवला जावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.’

Loading...

भागवतांच्या वक्तव्याला काँग्रेस व बसपने जोरदार आक्षेप घेतला होता. भागवतांच्या वक्तव्यामुळे रा. स्व. संघ आणि भाजप यांचा दलित-मागास विरोधी चेहरा उघड झाल्याचा आरोप, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.