Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय
Supreme Court | नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
सत्ता संघर्षाचा निकाल 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती. अशात 11 मे रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. सत्ता संघर्षाचा प्रश्न न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांकडे देखील देऊ शकतात, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
या निकालाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. काहींच्या मते शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरतील. तर काहींच्या मते हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. आमदार अपात्र झाले तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे बहुतांशांकडून म्हटलं जात आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात (Uddhav Thackeray can become Chief Minister again)
दरम्यान, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मोठं विधान कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे. उल्हास बापट म्हणाले, “आत्ताच्या अध्यक्षांनाच हा अधिकार मिळणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कठीण निर्णय दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी जे सत्र बोलावलं होतं, ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं बोलवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राज्यपालांचे आदेश चुकीचे आहे, असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला तर सर्वोच्च न्यायालय स्टेट्सको अँटी निर्माण करू शकतो. म्हणजे परिस्थिती पूर्वावत होऊ शकते आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | “उद्धव ठाकरेंनी मुंबईत दंगली भडकवण्यासाठी बैठक घेतली होती” ; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य
- Sanjay Shirsat | “शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली” : संजय शिरसाट
- Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात’ ; कायदे तज्ञांचं मोठे विधान
- Rahul Narwekar | “…म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात” ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा
- Devendra Fadnavis | “राज्यातील काही राजकीय पंडित…” ; सत्ता संघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Comments are closed.