Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

येत्या 11 किंवा 12 तारखेला सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती शाह 15 मे रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे 11 किंवा 12 मे रोजी हा निकाल लागू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री गेले तर सरकार कोसळण्याची शक्यता असते.  मुख्यमंत्र्यांना वाटलं की, आपण अपात्र ठरू शकतो तर ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाठ म्हणाले,”राज्यातील सत्तासंघर्षचा निकाल येत्या दोन-तीन दिवसात लागण्याची शक्यता आहे. हा निकाल आमच्या विरोधात लागेल आणि आमचे सरकार पडेल असं अनेकांना वाटत आहे. मात्र, असं काहीही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही सत्ता आमचीच राहणार आहे.”

महत्वाच्या बातम्या