InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना गोगोई यांनी हे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीशांनी सांगितले की, लैंगिक छळाचे आरोप करणारी महिलाच चार दिवस तुरुंगात होती आणि तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तसेच तिला पोलिसांनीही तंबी दिली होती. देशाच्या न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून काही शक्तींचा या महिलेला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.

सध्या ती महिला सुप्रीम कोर्टात कार्यरत नसून, महिलेने सुप्रीम कोर्टात यासंदर्भात तक्रार दिली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या तक्रारीची शनिवारी सकाळी तातडीने सुनावणी झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply