InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा’, बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचे आदेश

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा राजीनाम्याचा चेंडू पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे. याचिका दाखल करणाऱ्या आमदारांना आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर करुन आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष या आमदारांच्या राजीनाम्यावर आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मुंबईत आलेल्या कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याने त्यांना ते मंजूर करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने दहा बंडखोर आमदारांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या आमदारांना सुरक्षा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कर्नाटक पोलिसांना दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply