InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार

- Advertisement -

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने तुर्तास नकार दिला आहे. दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका करु शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करत काही जणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तुर्तास नकार दिला आहे. पण दोन आठवड्यानंतर स्थगिती देण्याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्य पीठापुढे आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कुणबी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळू नये, यासाठी माजी अ‍ॅटर्नी जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकिलांची फौज बाजू मांडली.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.