Supriya Sule | “अपूर्ण अभ्यास करायचा आणि…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शरद पवार यांचे पुस्तक सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण वाचलं तर त्यामध्ये शंभर असे उल्लेख आहेत, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं गेलं आहे. याला सिलेक्टिव्ह इमिग्रेशिया असे म्हणतात. पूर्ण अभ्यास करायचा नाही. कोणीतरी काढून दिलेल्या नोट्स वाचून दाखवायच्या. दरवेळी माणूस त्यावर पास होत नाही. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचायचं असतं.”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (What did Devendra Fadnavis say?)
गुरुवारी झालेल्या भाजपच्या कार्यकारी बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, राज्यातील घडामोडींच्या बातम्या उद्धव ठाकरेंकडे नसे, ज्या मुख्यमंत्र्यांकडे असायला हव्या. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनेत उद्रेक होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. कुठे काय घडतंय याकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष नसायचं. त्याचबरोबर उद्या काय घडेल? याचा अंदाज घेण्याची क्षमता देखील त्यांच्याकडे नव्हती.”
दरम्यान,“जिल्हा परिषद असो किंवा लोकसभा-विधानसभा निवडणूक असो, आपला निवडून येण्याचा फॉर्मुला एकच आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदीजींची कार्यशैली. महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पॅटर्न चालणार’, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | “माझ्या जिवाला धोका…”; बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
- Tuljabhavani Mandir | तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न!
- Nitesh Rane | “एक रुपयाचीही कमाई नसताना उद्धव ठाकरे…”; नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात
- Samana Editorial | “स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र
- Sanjay Raut | “कुणाचा पोपट उडतोय…”; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
Original NEWS SOURCE – https://bit.ly/45h8kS0
Comments are closed.