Supriya Sule | “ईडी सरकार हे इंग्रजांचं सरकार वाटतंय”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका 

Supriya Sule | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत.

“ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे. जनरल डायर या देशात आले आणि त्यांनी ठरवले आहे महाराष्ट्रचे तुकडे करायचे. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात कारभार सुरु आहे,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर जात आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. प्रतिनिधी किंवा नगरसेवक हा सगळ्यांच्या रोजच्या सुखदु:खात असतो. ही निवडणूक तातडीने घेतलीच पाहिजे, असं आमचं मत आहे.”

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत कमजोर, हतबल अंस सरकार बसलेल आहे. त्यांना महाराष्ट्र माहित नाही. महाराष्ट्र समजलेला नाही. मुख्यमंत्री त्यांच्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. ज्या पद्धतीने सरकार आले आहे. त्यामुळे देशातील अनेक राजकीय दरोडेखोरांना असे वाटत आहे. की आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो. हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही. तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार राहणार नाही.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.