Supriya Sule | ‘टाटाएअर बस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Supriya Sule | मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata Airbus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर  महाविकास आघाडीकडून (MVA) शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)

सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.  तुम्ही(भाजप) म्हणत आहात हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गेला. नंतर तुम्ही म्हणत आहात की आम्ही हा प्रकल्प नागपूरलाच करणार आहोत आणि नंतर म्हणत आहात की उपमुख्यमंत्री मन वळवण्यात कमी पडले. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं बोलते. त्यामुळे मी प्रचंड गोंधळले आहे. मी विरोधक म्हणून विचारत नाही.

मी या राज्याची एक नागरिक आहे. या देशाची एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला वाटतं हा आपल्या सगळ्यांनाच अधिकार आहे की नक्की सत्य काय आहे. त्यामुळे टाटा एअर बस प्रकरणात सरकारने वस्तूस्थिती समोर आणावी. राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे कशी जाते हा नागरिक म्हणून प्रश्न पडतो.

तसेच, सुप्रिया सुळे दिवाळी कार्यक्रमाच्या जाहिरातीबाबतही बोलल्या आहे. मराठी दिवाळी साजरी करताय, मला दिवाळी असते हे माहिती होतं. पण माझी विनम्र विनंती आहे की मराठी दिवाळीचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी जी स्वत:ची जाहिरात केली त्यातून बेस्टला जर पैसे मिळणार असतील तर आनंदच आहे. त्यामुळे जाहिराती नक्कीच करा परंतु लोकालोकांमध्ये एवढं विभाजन कशासाठी? मराठी भाषेवर जर प्रेम असेल तर कृती करून दाखवा. मराठी वाचनालये आहेत त्यांना मदत करा, मराठी भाषेसाठी काहीतरी वेगळं करा. तसं न करता केवळ स्वत:च्या जाहिरातबाजीत मराठीपणा नकोय. आम्ही मराठी लोक फार स्वाभिमानी आहोत. पण आम्ही भारतीय आहोत याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मराठी असण्याचाही सार्थ अभिमान असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.