Supriya Sule | पुण्यातील चांदणी चौकातील पुलासाठी सुप्रिया सुळेंनी सुचवलं ‘हे’ नाव

Supriya Sule | पुणे: पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे काम जोरात सुरू आहे. लवकरच या उड्डाणपुलाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुलासाठी नाव सुचवलं आहे. सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक उड्डाणपूलाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे ट्विट (Supriya Sule Tweet)

पुणे शहरातील चांदणी चौक येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार काम देखील सुरु आहे. आता हे काम अंतीम टप्प्यात आहे.
हा पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासोबतच तो पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे. मुळशी तालुक्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी १९२१ साली शेतकरी व भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा ‘मुळशी सत्याग्रह’ केला.या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांपैकी हे एक महत्त्वाचे आंदोलन अशी त्याची नोंद आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. यासाठी माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण यासंदर्भात सकारात्मक विचार करुन यासंदर्भात निर्णय घ्यावा.
थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 मध्ये भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा मुळशी सत्याग्रह केला होता. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाणपूल असल्याचे नाव द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
You might also like

Comments are closed.