Supriya Sule | बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “जे लोक असं बोलतात ते…”

Supriya Sule | पुणे : संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, असं वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.

त्या म्हणाल्या, “धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीच आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर धाम यांनी जगतगुरु तुकारामाबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली.

बागेश्वर बाबांचं वक्तव्य काय?

ते म्हणाले, “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.