Supriya Sule | भाजप च्युइंगमसारखा बेचव होत चालला आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शपथविधीचा प्लॅन झाला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवार मागे सरकले, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis is still stuck on that oath – Supriya Sule

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस अजूनही त्या शपथविधीत अडकलेले आहे. कारण त्यांना राज्यातील मूळ मुद्द्यात हातच घालायचा नाही. देवेंद्र फडणवीस कधीच महिला सुरक्षा, महागाई आणि मूलभूत गोष्टींवर भाष्य करत नाही. महिला भगिनीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देखील ते कधीच बोलत नाही.”

पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “प्रशासन सोडून सातत्याने मागे जाणं, गॉसिप करणं या गोष्टींमध्येच हे सरकार मग्न आहे आणि हे सर्व खूप दुर्दैवी आहे. प्रशासन सोडून हे सरकार सगळं करतं. भारतीय जनता पक्षाचं च्युइंगमसारखा झालं आहे. च्युइंगम पहिल्यांदा खाल्ल्यावर चांगलं वाटतं, नंतर ते बेचव होत जातं. असंच भारतीय जनता पक्षाचं झालं आहे. च्युइंगमप्रमाणे भारतीय जनता पक्षाची टेस्ट दिवसेंदिवस खराब होत चालली आहे”

“मला बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि संघटनेची इतकी काम असतात की मला गॉसिप करायला फारसा वेळ मिळत नाही. भारतीय जनता पक्षाला शरद पवार आणि अजित पवार यांच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही.”, असही त्या (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JCU9x7

You might also like

Comments are closed.