Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी

Supriya Sule | बारामती : राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. महाविकास आघडीचे सरकार जाऊन आता सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पुढच्या निवडणुकीला आणखी दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. तरीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीची गणितं अद्याप सुटलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपला नेताच पुढचा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार तयारी दाखवत आहेत.

सुप्रिया सुळे आक्रमक

मागच्या महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागलेले आहेत.यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या बॅनरवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्या बोलत होत्या.

“महिलेचा फोटो लावणे याचा कुणाला अधिकार नाही”

“एकतर पोस्टर कोणी लावला? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावणे. याचाही कुणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule talk about Baners

“हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा”, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

जयंत पाटील, अजित पवारांच्या फोटोनंतर आता सुप्रिया सुळेंचा फोटो

“जयंत पाटील यांच्यासाठी लागलेले बॅनर हे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझा आणि दादांसाठी लावलेल्या बॅनरवर कुणाचेही नाव नाही. तसेच कटआऊटची पद्धतही सारखीच आहे, त्यामुळे याच्यामागे कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा”, असेही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय मुंबईच्या बेलार्ड इस्टेट या भागात आहे. या कार्यालयाच्या बाहेर काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच वादा, अजित दादा!” असा मोठा आशयाचे पोस्टर लावला गेला होता. या बॅनरवरुन प्रश्न विचारले जाताच. तात्काळ हा बॅनर तिथून हटविण्यात आला होता.

अजित पवारांच्या पोस्टरनंतर आता त्याच ठिकाणी रात्री “सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री” अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आला होता. पक्षात गदारोळ झाल्यानंतर सकाळी हा बॅनर प्रदेश कार्यालयाच्या बाहेरून हटविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-