Supriya Sule | मुख्यमंत्री ज्योतिषाकडे गेले अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल शिर्डी दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते ज्योतिषाकडे देखील गेले. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

यावेळी, महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांनी श्रद्धा ही ठेवलीच पाहिजेत पण अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रात वेगळं मत आहे, असा टोला सुळेंनी लगावला आहे. दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात देशातच नव्हे तर राज्यात खूप मोठं काम केलं आहे, त्यांनी आयुष्यपणाला लावले. महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांनी श्रद्धा ही ठेवलीच पाहिजेत पण अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रात वेगळं मत आहे, असं देखील त्या म्हणाल्या.

आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही.” मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.