Supriya Sule | “राजकारणाचे माहीत नाही; पण…”, सुप्रिया सुळेंचं विधान

Supriya Sule | पुणे : पुणे येथील आनंदी जीवनाचा- राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषदेमध्ये राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. या परिषदेत डॉ. सुवर्णा बोबडे, डॉ. हमीद दाभोळकर, ‘डॉ. चंद्रशेखर देसाई, आणि डॉ. विद्याधर वाटवे यांनी देखील उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना, कोविड काळात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकमेकांची मदत केली. ही सामाजिक भावना अत्यंत मोलाची आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा, तर महाराष्ट्राचे राजकारण आज योग्य दिशेने चाललंय की नाही, हे मला सांगता यायचे नाही, पण समाजकारण मात्र अगदी योग्य दिशेने चालले आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, मानसिक आजार आपण लपवून ठेवतो. मन कुठे आहे हे कुठल्याही अभ्यासक्रमात नाही. आपल्या आयुष्याचा वाढलेला वेग, तुलना, स्पर्धा यामुळे तणाव वाढला आहे. मनोरूग्णांची वाढती संख्या पाहता मानसिक उपचार करणारांची संख्या नगण्य आहे. या पोकळीतून बाबा बुवांची संख्या वाढली. नंदुरबार सारख्या ठिकाणी एखादाच मानसोपचारतज्ज्ञ आहे. तर पुण्यात जास्त आहेत. आशाताई, आरोग्य कर्मचा-यांना दोन आठवड्याचे प्रशिक्षण देवून ते मानसिक आजारांवर प्राथमिक उपचार करू शकतात, असं त्या ठिकाणी हमीद दाभोळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.