Supriya Sule | “राज्यात वडील पळवायची शर्यत सुरुय, रेकॉर्ड करून ठेवा, शरद पवार माझेच वडील आहेत”; सुप्रिया सुळेंची कोपरखळी

Supriya Sule | पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये (Saswad)  सत्यशोधक समाजच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सत्यशोधक समाज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगवला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.

“शरद पवार माझेच वडील आहेत हे रेकॉर्ड करून ठेवा” (Supriya Sule Talk About Sharad Pawar)

राज्यात सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय, पण शरद पवार हे वडील माझेच आहेत. ती जागा मी दुसऱ्या कुणाला घेऊ देणार नाही. शरद पवार (Sharad Pawar) माझेच वडील आहेत हे रेकॉर्ड करून ठेवा, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाला चांगलीच कोपरखळी मारली आहे. त्या पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठणकावून सांगितलं., अशी कोपरखळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मारली आहे.

“विचारांचा वारसा घ्यायचा तर घ्या” (If anyone wants to inherit Sharad Pawar’s thinking, it is yours more than me)

सत्यशोधक समाज परिषदेच्या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. “शरद पवारांच्या विचाराचा वारसा जर कोणाला घ्यायचा असेल, तर ते माझ्यापेक्षा ते तुमचे जास्त आहेत”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही” (Love Jihad does not exist in any Dictionary)

“अजित दादा (Ajit Pawar) पण दौऱ्यासाठी बाहेर जातो, मी पण बाहेर जाते. दादा रात्री दीड वाजता आला तरी मला कुणी म्हणत नाही की तू संध्याकाळी 7 वाजता ये. जेवढा दादाला अधिकार आहे तेवढाच मला आहे. लव्ह जिहादचा (Love Jihad) अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.